Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री! 

mosami kewat by mosami kewat
March 5, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री! 
       
T20 World Cup: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूला वळवला.

२५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. फिल सॉल्ट फक्त ५ धावांवर बाद झाला. जोस बटलरने काही आक्रमक फटके मारले, पण तोही २५ धावांवर माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुक ७ धावांवर बाद झाला, तर टॉम बँटनने १७ धावा केल्या.

यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्स यांनी डाव सावरत इंग्लंडला सामन्यात परत आणले. जॅक्सने ३५ धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर बेथलने दमदार शतक झळकावून इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ नेले. मात्र शेवटच्या क्षणी भारतीय संघाने दडपण कायम ठेवत इंग्लंडचा डाव रोखला आणि सामना ७ धावांनी जिंकला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताच्या फलंदाजांनी त्याचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभारली. अभिषेक शर्मा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी ९६ धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव मजबूत केला.

सॅमसनने शानदार ८९ धावांची खेळी केली, तर इशान किशनने ३९ धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने ४३ धावा करत आक्रमक खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने २७ धावा केल्या, तर तिलक वर्माने २१ धावांचे योगदान देत भारताची धावसंख्या २५३ पर्यंत पोहोचवली.

या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने फायनल गाठत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. आता २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे.

आता फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून क्रिकेट चाहत्यांना आणखी एका रोमांचक सामन्याची प्रतीक्षा लागली आहे. 

Tags: cricketIndia vs England matchMatchPlayersSemifinalT20 world cupवानखेडे
Previous Post

MPSC Result 2026 : पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वराज चव्हाण यांची निवड

Next Post

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!

Next Post
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम
बातमी

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

by mosami kewat
September 6, 2026
0

पुणे : आगळंबे येथे सांचीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांचा...

Read moreDetails
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026
चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home