Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

mosami kewat by mosami kewat
February 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने
       
परभणी : शक्तीपीठ महामार्गावरून परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसणारा असंतोष आज उफाळून आला. आज सहजपूर जवळा येथे प्रशासनाकडून महामार्गाची मोजणी सुरू असताना शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने आले. या दरम्यान एका संतप्त शेतकऱ्याने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

आज सकाळपासून सहजपूर जवळा परिसरात प्रशासकीय पथकाने पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू केली होती. प्रशासनाने मोजणीची भूमिका घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले. आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात मोठी वादावादी झाली. आमच्या जमिनी जाऊ देणार नाही, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी काम रोखण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. (Parbhani Farmers Clash)

शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणेपासूनच जिल्ह्यातील शेतकरी विरोधाच्या भूमिकेत आहेत. प्रस्तावित रस्ता शेतीपासून सुमारे 20 फूट उंच असणार आहे, ज्यामुळे शेतात येण्या-जाण्यास आणि पाण्याचा निचरा होण्यास मोठी अडचण निर्माण होईल. तसेच अनेक अल्पभूधारकांची संपूर्ण शेती या मार्गाखाली जाणार असल्याने ते भूमिहीन आणि ‘देशोधडीला’ लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रशासनाने काल रात्री उशिरा (सुमारे 12 ते 1 च्या दरम्यान) घरांवर नोटिसा चिकटवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, हा प्रकार अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परभणी जिल्ह्यातून हा महामार्ग साधारण 71 किलोमीटर जाणार आहे. यामुळे अनेक गावे आणि शेकडो शेतकरी बाधित होणार आहेत.

Tags: MaharashtraparbhaniParbhani Farmers ClashpolicePoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

Next Post

बीड जिल्ह्यातील सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उद्ध्वस्त, वंचितच्या ॲड. अरुण जाधव यांची घटनास्थळी भेट !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home