Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

mosami kewat by mosami kewat
February 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड
       
हिंगोली : वसमत तालुक्यातील बाभुळगाव सर्कल अंतर्गत येत असलेल्या मुडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या चित्रकला सिद्धार्थ करवंदे यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी मनिषा कैलास पडोळे यांची वर्णी लागली आहे.

शाळेतील सर्व माता-पालक सदस्यांची निवड झाल्यानंतर, नवनियुक्त सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये चित्रकला करवंदे यांच्या नावावर बहुमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्याध्यापिका अवचार आणि कदम यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन अत्यंत सुरळीतपणे पार पाडले. (Vanchit bahujan aghadi)

या निवडीच्या वेळी मुडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या निवडीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमादार उपरे आणि बेंगाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने माजी शालेय व्यवस्थापन समितीचा निरोप समारंभ व सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षा व सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

Tags: HingoliMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

Next Post

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

अग्निवीरला 'आर्मी ऍक्ट' लागू व्हावा; देशात दुसऱ्या 'गोध्रा'ची भीती - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश
बातमी

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

by mosami kewat
June 20, 2026
0

पुणे : पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि. १९) नीट पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले....

Read moreDetails
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

June 19, 2026
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home