Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स देण्याच्या प्रस्तावास सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विरोध

mosami kewat by mosami kewat
February 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स देण्याच्या प्रस्तावास सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विरोध
       
नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक (क्रेडिट पॉइंट्स) देण्याचा प्रस्ताव शैक्षणिकदृष्ट्या चुकीचा आणि चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवांना निवेदन देण्यात आले.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ ही धर्मनिरपेक्ष संस्था असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी अधिकृत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स देण्याचे आमिष दाखवणे हे विद्यापीठाच्या नियमावली तसेच भारतीय संविधानातील मूल्यांच्या विरोधात आहे. अशा निर्णयामुळे धार्मिक कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या किंवा केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव निर्माण होऊ शकतो. (Nashik news)

या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव संजय सानप यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, विद्यापीठाकडून अद्याप असा कोणताही अधिकृत परिपत्रक काढण्यात आलेला नाही. मात्र, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने सादर केलेल्या निवेदनावर गांभीर्याने विचार करून या विषयावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांची भूमिका लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

तसेच, स्वयंस्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागाचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सम्यक विद्यार्थी आंदोलनाची भूमिका योग्य असल्याचे सांगत ही बाब विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देण्यात आले. (Nashik news)

या निवेदनाच्या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधीमंडळात मिहिर गजबे (जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक), गौतमी धिवरे, वैष्णवी पाटील, सुरज पाटील, दीपेश वाव्हाळ, आदित्य निर्भावणे, प्रज्ञा जाधव, स्वामी होळकर आणि नागेश गोणेकर यांचा सहभाग होता.

Tags: EducationMaharashtranashikNashik newspolticspuneSavitribai Phule Pune UniversitystudentVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

रमाई जयंती विशेष ! बाबासाहेबांच्या हृदयातील रमाई

Next Post

इस्लामाबाद स्फोटः नमाज सुरू असताना मशिदीत आत्मघातकी स्फोट;  हल्ल्यात ६९ ठार; १६९ हून अधिक जण गंभीर जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम
बातमी

नांदेड : खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांची भेट; वृक्षारोपण उपक्रम

by mosami kewat
August 11, 2026
0

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी नांदेड येथील खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला भेट दिली....

Read moreDetails
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न; सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांशी थेट संभाषण

August 11, 2026
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

August 11, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

August 11, 2026
युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home