Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

mosami kewat by mosami kewat
February 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड
       
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या १७ व्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची, तर उपमहापौरपदी सचिन भेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीपेक्षाही सभागृहात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः एमआयएमच्या (MIM) नगरसेविकेने चक्क भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सदस्यांना हात उंचावून मतदान करण्यास सांगण्यात आले. भाजप आणि मित्रपक्षांच्या सदस्यांनी हात उंचावले असतानाच, एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान केले. केवळ महापौरच नव्हे, तर उपमहापौर पदासाठीही त्यांनी सचिन भेंडे यांना मतदान केले. (mim supports bjp in amravati)

सोशल मीडियावर टीकेची झोड; ‘मिलीभगत’ची चर्चा

भाजप आणि एमआयएम या दोन परस्परविरोधी विचारधारा असलेल्या पक्षांमध्ये झालेल्या या छुप्या युतीमुळे अमरावतीकर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर या घटनेचे मिम्स व्हायरल होत असून, पक्षाची विचारधारा नेमकी कुठे गेली? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सत्तेसाठी ही ‘मिलीभगत’ आहे का, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. (mim supports bjp in amravati)

नागरिकांच्या विश्वासाला तडा देऊन स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे, अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: amravatiAudiologistbjpElection newsLocal body electionMaharashtraMimmim supports bjp in amravatiPoliticalVanchit Bahujan AaghadiZp election
Previous Post

स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

Next Post

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Next Post
Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
क्रीडा

अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’

by mosami kewat
February 6, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक !  Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले...

Read moreDetails
अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

February 6, 2026
Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

February 6, 2026
अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

February 6, 2026
स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

February 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home