Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
       

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, वंचित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी चळवळ आहे. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींना सत्तेबाहेर ठेवा आणि आपल्या हक्कासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्या, असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेवराई तांडा येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Sujat ambedkar)

सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या घटकांसाठी वंचित बहुजन आघाडी ठोस धोरण राबवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्तेत बसलेल्यांनी वर्षानुवर्षे जनतेची फसवणूक केली आहे. आता केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. (Sujat ambedkar)

सभेदरम्यान सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांवर तीव्र शब्दांत टीका केली. भ्रष्टाचार, निधींचा गैरवापर आणि विकासकामांतील हलगर्जीपणा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. ही निवडणूक म्हणजे बदलाची संधी आहे. भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी मतदारांनी जागृत राहून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या प्रचार सभेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. युवक, महिला, शेतकरी तसेच विविध समाजघटकांनी सभेला उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. (Sujat ambedkar)

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, स्थानिक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकरांच्या या आक्रमक व मुद्देसूद भाषणामुळे गेवराई तांडा परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.


       
Tags: aurangabadAurangabad newsElectionElection campaignMaharashtraPoliticalpoliticsSujat AmbedkarSujat Ambedkar election campaignVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

Next Post

पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन

Next Post
पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन

पंढरपुरात 'वंचित'ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home