Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

mosami kewat by mosami kewat
January 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 
       

बारामती: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या खाजगी विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  

अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली – 

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवरून दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, “अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने मी स्तब्ध झाले आहे. मी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी, मुले आणि पवार कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त करते.” (Ajit Pawar passed away)

अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे झंझावाती सभेसाठी रवाना झाले होते. बारामती विमानतळावर विमान लँडिंगच्या तयारीत असतानाच वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच विमान धावपट्टीच्या जवळ असलेल्या शेतात कोसळले आणि विमानाने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण विमान जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने कोणाचेही प्राण वाचवता आले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने  संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे.


       
Tags: Ajit PawarAnjali AmbedkarMaharashtraPoliticalpolticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

Next Post

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

Next Post
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’
बातमी

विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’

by mosami kewat
July 17, 2026
0

नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय...

Read moreDetails
गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

July 17, 2026
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

July 16, 2026
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home