नाशिक: नाशिकमधील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी माधवी जाधव यांना धीर देत, या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
माधवी जाधव यांनी घडलेला संपूर्ण घटनाक्रम ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मांडला. गिरीश महाजन यांच्या वागणुकीतून त्यांची ‘नीच मानसिकता’ दिसून येते असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले “हे कृत्य केवळ अपमानजनक नसून अट्रॉसिटी कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा ठरणारे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. (girish mahajan nashik controversy)
वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पश्चिम कमिटीकडून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, जर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, तर स्वतः प्रकाश आंबेडकर या प्रकरणाचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडतील.
“आरएसएस आणि भाजपकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बहुजन समाजातील व्यक्तींचा अवमान केला जात आहे,” असा म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध केला आहे.(girish mahajan nashik controversy)
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे माधवी जाधव यांना पाठिंबा दिला आहे. यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ताबडतोब घटनेची दखल घेत कर्मचारी माधवी जाधव यांच्याशी संवाद साधला.






