औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या सर्वात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेल्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये अखेर मतदारांनी आपला कौल स्पष्ट केला. या प्रभागातून चारही उमेदवारांनी एकहाती सत्ता मिळवत ‘क्लीन स्वीप’ दिला आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचा वैचारिक व सांस्कृतिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे शाहीर मेघानंद बाबुराव जाधव यांना वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

प्रा. डॉ. करुणा मेघानंद जाधव यांना प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण महिला) मधून उमेदवारी देण्यात आली होती, या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीने सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणात मानाचे स्थान देण्यात आले होते.
प्रभाग ३ च्या विकासाची धुरा आता या शिलेदारांच्या हाती असेल:
अ – अमित भुईगळ
ब – जरीना जावेद कुरेशी
क – करुणा मेघानंद जाधव
ड – अफसर खान यासीन खान
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत “कोण आला रे कोण आला, प्रभाग ३ चा वाघ आला!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी पेढे वाटप करण्यात आले असून, महिला कार्यकर्त्यांनीही फुगड्या खेळत या विजयाचा आनंद साजरा केला.
हा विजय केवळ उमेदवारांचा नसून प्रभागातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे, अशी भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन या पॅनेलने दिले होते, ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
“हा जनतेचा विजय आहे! आम्ही दिलेल्या शब्दाला जागू आणि प्रभाग ३ ला शहरात आदर्श प्रभाग बनवू. अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली.





