अकोला : नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अकोला शहर आज अविकसित अवस्थेत असून रस्ते, गटारे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.” असे अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथील सभेत नागरिकांना संबोधित केले.
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रभाग क्रमांक ५ (ड) चे अधिकृत उमेदवार शुद्धोधन वासुदेवराव पळसपगार यांच्या प्रचारार्थ लहान उमरी येथे आयोजित सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली.
अकोला शहराचा कायापालट करण्यासाठी आता मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अकोल्याला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
१) रस्ते आणि सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी सुसज्ज गटार व्यवस्था निर्माण करणे.
२) सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
३) महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारून गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे.
“अकोलेकरांनी अनेक वर्षे इतरांना संधी दिली, आता एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या. आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शुद्धोधन पळसपगार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचार सभेला लहान उमरी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.






