अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीला सुरु असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे. वंचितच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ८ मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
रेल्वे गेट ते डाबकी रोडपर्यंत शक्तीप्रदर्शन
ही रॅली रेल्वे गेटपासून सुरू होऊन डाबकी रोडपर्यंत काढण्यात आली. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत अंजलीताईंनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

विकासाचा नवा अजेंडा: ‘स्वच्छ आणि सुंदर अकोला’
प्रचारादरम्यान जनतेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, अकोला शहराचा विकास रखडलेला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी आता बदलाची गरज आहे. त्यांनी शहरातील रस्ते आणि सांडपाण्याच्या गटारांची दुरवस्था सुधारणे,
सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, मनपा शाळांचा दर्जा सुधारून त्या खासगी शाळांच्या तोडीस तोड बनवणे, अकोला शहर ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून विकसित करणे.
अकोलेकरांनी आजवर अनेक सत्ताधाऱ्यांना पाहिले आहे, मात्र शहराचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे यावेळी अकोला शहरवासीयांनी खंबीरपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे आणि शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी, असे आवाहन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी यावेळी केले.
या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






