औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये एक अनपेक्षित राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली माघार जाहीर केली असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश दामू पटेकर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
प्रभाग ९ हा सुरुवातीपासूनच चुरशीचा मानला जात होता. शिवसेनेने (UBT) या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला, मात्र उमेदवाराने माघार घेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश दामू पटेकर हे प्रभागात जनसंपर्कासाठी ओळखले जातात. आता शिवसेनेचा (UBT) पाठिंबा मिळाल्याने त्याचा विजय आता निश्चित मनाला जातो आहे.
“हा पाठिंबा केवळ राजकीय नसून प्रभागाच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रभाग ९ मधील ही पाठींबा इतर प्रभागांवर काय परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






