Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

काँग्रेसची माघार, ‘वंचित’ला बळ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम पटेल यांचा आयुब खान यांना पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
January 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
काँग्रेसची माघार, ‘वंचित’ला बळ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम पटेल यांचा आयुब खान यांना पाठिंबा
       
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे  नेते आणि माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असला तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद  द्विगुणित झाली आहे. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इब्राहिम पटेल हे प्रभाग ११ मधील एक अनुभवी आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व मानले जातात. त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन थेट वंचितच्या उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आता इब्राहिम पटेल यांच्या रूपाने मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला आहे. पटेल यांच्या समर्थकांनी आता आयुब खान यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे पारडे जड झाले असून विरोधकांची इथेच हार झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे 

या आधी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ९  प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली माघार जाहीर केली होती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश दामू पटेकर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आता हा दुसऱ्यांदा प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समोर आपली माघार घेत वंचितलाच पाठींबा दिला आहे.

Tags: Aurangabad municipal corporation electionElectionMaharashtraMunicipal corporation electionpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना पाठिंबा

Next Post

कंधार नगरपालिका: वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दिलीप देशमुख यांची निवड

Next Post
कंधार नगरपालिका: वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दिलीप देशमुख यांची निवड

कंधार नगरपालिका: वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दिलीप देशमुख यांची निवड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home