नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने नवी मुंबईतील विविध प्रभागांमधून एकूण 18 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले असून, वंचित बहुजन समाजातील प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या यादीत नमिता राजेश भालेराव प्रभाग क्र. 1(अ), भूषण लक्ष्मण कासारे प्रभाग क्र. 3(अ), माया गौतम मनवर प्रभाग क्र. 3 (क ), सुवर्णमाला बाळू डोळस प्रभाग क्र. 4(अ ), विश्वास चंद्रकांत गांगुर्डे प्रभाग क्र. 4(ड ), अजय राम गायकवाड प्रभाग क्र. 6(अ ), जनार्दन दामोदर थोरात प्रभाग 7(अ ), संजय अंकुश गायकवाड प्रभाग क्र. 10 (ड ),सुरज दशरथ वाकळे प्रभाग क्र. 14(क ),रामदास शामराव सोनवणे प्रभाग क्र. 14(ड ),सारिका सुनील भोळे प्रभाग 20(अ ), दिनेश सुभाषचंद्र पुटगे प्रभाग क्र. 20(ड ),भारती मानसिंग जाधव प्रभाग क्र.22 ( ड ),कल्याण हरिभाऊ हणवते प्रभाग क्र. 23(क ),माजिद अनवर इब्जी प्रभाग क्र. 25(ड ),पूजा उमेश हातेकर प्रभाग क्र. 26(ब /क ), उमेश हरिदास हातेकर प्रभाग क्र. 26(ड ),राहुल शंकर शिरसाट प्रभाग क्र. 28(क ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि गृहनिर्माण यांसारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे निवडणूक लढवणार आहे.






