Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!

mosami kewat by mosami kewat
December 27, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!
       
मालेगावात वंचित बहुजन आघाडी निर्णायक

मालेगाव :  आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

मालेगाव सेक्युलर फ्रंटमध्ये वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांचा सहभाग असून, आगामी महापालिका निवडणूक ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आघाडीच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या विकासासाठी, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.

युतीच्या घोषणेसाठी प्रमुख उपस्थिती : 

या संयुक्त पत्रकार परिषदेस मालेगाव सेक्युलर फ्रंट व सहभागी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

यामध्ये माजी आमदार व इस्लाम पक्षाचे प्रमुख शेख आसिफ शेख रशीद, समाजवादी पार्टीचे प्रमुख व माजी नगरसेवक मुस्तकीम डिग्नीटी, डॉ. अखलाख, वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत युतीची भूमिका, निवडणूक रणनीती तसेच मालेगाव शहराच्या प्रश्नांवर संयुक्त भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या युतीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत 12 -15 जागा जाहीर करण्यात आल्या असून, काही जागांवर अजून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात मालेगाव शहरात या मालेगाव सेक्युलर फ्रंटची मोठी ताकद निर्माण झाली आहे.

Tags: allianceMaharashtraMalegaon electionMunicipal corporation electionpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindiavote
Previous Post

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!
बातमी

मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!

by mosami kewat
December 27, 2025
0

मालेगावात वंचित बहुजन आघाडी निर्णायक मालेगाव :  आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर...

Read moreDetails
कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ!

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ!

December 27, 2025
मनसेला मोठा झटका! औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा वंचितमध्ये जाहीर प्रवेश

मनसेला मोठा झटका! औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा वंचितमध्ये जाहीर प्रवेश

December 27, 2025
अमरावती महानगरपालिकेत चालणार अकोला पॅटर्न – सागर भवते

अमरावती महानगरपालिकेत चालणार अकोला पॅटर्न – सागर भवते

December 27, 2025
स्त्री मुक्ती दिन: जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन करून क्रांतीदिनाचे अभिवादन

स्त्री मुक्ती दिन: जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन करून क्रांतीदिनाचे अभिवादन

December 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home