रायपूर : छत्तीसगढ येथे धक्कादायक घटना घडली आहे. ख्रिसमसच्या दिवशी बजरंग दलाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांकडून कडून एका मॉलमध्ये तोडफोड केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण झाले आहे.बजरंग दलाकडून फक्त तोडफोड केले नसून तेथील लोकांना त्यांचे धर्माचे विचारपूस केले. रायपूर येथील प्रसिद्ध ‘मॅग्नेटो मॉल’मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. लाठ्या-काठ्यांसह धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.
मॉलमध्ये घुसलेल्या जमावाने तेथील कर्मचाऱ्यांना त्यांची जात आणि धर्म विचारून लक्ष केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मॉलच्या मार्केटिंग प्रमुख आभा गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदच्या आवाहनामुळे मॉल आधीच पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. तरीही ५० ते १०० लोकांचा जमाव हॉकी स्टिक आणि काठ्या घेऊन जबरदस्तीने मॉलमध्ये घुसले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आंदोलक मॉलच्या मालमत्तेचे नुकसान करताना स्पष्ट दिसत आहेत.
कर्मचाऱ्यांची जात-धर्म तपासत दहशत :
जमावाने केवळ तोडफोडच केली नाही, तर तेथील कर्मचारी आणि पाहुण्यांची ओळखपत्रे व बॅज तपासण्यास सुरुवात केली. “तू हिंदू आहेस की ख्रिश्चन?” आणि “तुझी जात कोणती?” असे प्रश्न विचारून कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मॉलमधील महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली असून अनेक कर्मचारी रडू लागले होते.
या हल्ल्यात मॉलचे साधारण १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जमावाने मौल्यवान वस्तूंची तोडफोड केली होती.
पोलिसांनी या प्रकरणी ३० ते ४० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११५(२), १९०, १९१(२), ३२४(२), आणि ३३१(३) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
या भयानक घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मॅग्नेटो मॉलच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ‘अंबुजा मॉल’ तातडीने रिकामा करण्यात आला.





