कंधार : नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील वैदू समाजाचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप संतराम देशमुख यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दिलीप देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
वंचितांच्या लढ्याला यशकंधार नगरपरिषद निवडणुकीत दिलीप देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. वैदू समाजासारख्या उपेक्षित समाजातून नगरसेवक पदापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी झालेल्या सत्कार सोहळ्यात बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलीप देशमुख यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सत्तेचे लाभ पोहोचवणे हीच वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप देशमुख यांच्या विजयामुळे कंधार भागात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






