औरंगाबाद : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी औरंगाबाद पश्चिम तालुका व जिल्ह्याच्या वतीने तिसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला.

पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव
वंचित बहुजन आघाडीच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तिसगाव येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली आणि पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड केले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले, तसेच निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अभिनंदन केले.

महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवातकार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. प्रारंभी चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भीम’ आणि ‘वंचित बहुजन आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या जल्लोष कार्यक्रमाला जिल्हा आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा महासचिव अंजन साळवे, जिल्हा महासचिव प्रवीण हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ महापुरे, जिल्हा संघटक खुशाल बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावराव गवई, जिल्हा सदस्य अंकुश जाधव तसेच याचसोबत एड. नामदेव सावते, माजी तालुका महासचिव एस. पी. हिवराळे, माजी तालुका उपाध्यक्ष प्रेम बनकर, उद्योजक सुगंध दाभाडे, उद्योजक भीमरत्न कांबळे.
कार्यकर्त्यांमध्ये महेंद्र तायडे, अण्णा जाधव, ज्ञानशील वाघमारे, अरविंद पवार, संघपाल इंगोले, राजू मोरे, संतोष दले, सुनील जोगदंड, शशिकांत गोफने, सूरज मनोहर, दत्ता मनोहर, अशोक वाहुळ, बबन बनसोडे, रोकडे, रजनीकांत त्रिभुवन, राहुल जाधव, राहुल बनसोडे, अरुण रूपेकर, मोहन इंगोले, अभिषेक दाभाडे.
याप्रसंगी परिसरातील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मोठा जनसमुदाय आणि वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विजय आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






