पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीच्या नियोजनासाठी श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे एक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक यशस्वीरीत्या पार पडली.

या बैठकीचे अध्यक्षस्थानी राजेंद्र पातोडे, प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी (महाराष्ट्र राज्य) यांनी भूषविले. बैठकीत रॅलीचे नियोजन, मार्ग, शिस्त, सुरक्षितता, स्वयंसेवक व्यवस्थापन तसेच जिल्हा व शहर पातळीवरील जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस अनिल जाधव व सर्वजित बनसोडे (राज्य उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), निर्मला वनशिव (प्रदेश सदस्य, महिला आघाडी), विशाल गवळी (प्रदेश सदस्य, वंचित बहुजन युवा आघाडी), अॅड. अरविंद तायडे (शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पुणे), सीमा भालेशेन (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, पुणे), अनिता चव्हाण (शहराध्यक्ष, महिला आघाडी, पुणे), राजरत्न थोरात (जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, पुणे), अनिल कांबळे (मेजर, समता सैनिक दल), रेखा चोरे, विक्रांता आल्हाट, सागर आल्हाट, चैतन्य इंगळे, दीपक कदम, गौतमभाऊ ललकारे, बी. पी. सावळे सर, राकेश धोत्रे, प्रवीण बागल, बाळासाहेब शिरसाट, अरविंद कांबळे, विवेकभाऊ लोंढे आदी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान भिमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला अभिवादन करताना शांतता, शिस्त व एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन करण्यात आले. राज्यभरातून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी या बाईक रॅलीत सहभागी व्हावे, असेही आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.
या नियोजन बैठकीला वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक अत्यंत उत्साही व सकारात्मक वातावरणात पार पडली.






