Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बारामतीत पराभवाच्या भीतीने ‘वंचित’च्या प्रचार गाडीवर हल्ला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना

mosami kewat by mosami kewat
December 18, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बारामतीत पराभवाच्या भीतीने ‘वंचित’च्या प्रचार गाडीवर हल्ला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना
       
बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती नगरपरिषद क्षेत्रात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगलदास निकाळजे यांच्या प्रचार रिक्षेची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच तोडफोडीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना करण्यात आले.

प्रस्थापितांकडून रडीचा डाव :

बारामती नगरपरिषदेसाठी अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर लावला असताना, बारामती एसटी स्टँड परिसरात वंचित बहुजन आघाडीची प्रचार रिक्षा फिरत असताना हा हल्ला झाला. पराभवाच्या भीतीने धास्तावलेल्या प्रस्थापितांनीच हा भ्याड हल्ला घडवून आणल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

रिक्षेची तोडफोड करत असताना महामानवांच्या फोटोंचे नुकसान करण्यात आले. या कृत्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त केले जात आहे. आचारसंहिता लागू असताना भररस्त्यात असा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘साम, दाम, दंड, भेद’ वापरला तरी हार मानणार नाही :

या घटनेनंतर उमेदवार मंगलदास निकाळजे आणि त्यांच्या समर्थकांनी अत्यंत आक्रमक जिद्दीची भूमिका घेतली आहे सांगितले की,”आमच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी हे कृत्य केले आहे. साम, दाम, दंड, भेद यांसारख्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही. या छळाला आम्ही मतदानाच्या माध्यमातून उत्तर देऊ आणि बारामती नगरपालिकेवर वंचितचा झेंडा फडकवून दाखवू.”

Tags: BaramatiDr Babasaheb AmbedkarElectionElection campaignElection commissionMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उत्तरदायित्व; प्रज्ञा विद्यामंदिर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

Next Post

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; पहिल्याच दिवशी ३२ इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
February 20, 2026
0

अहिल्यानगर: जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी गेल्या तीन वर्षांपासून खर्च न झाल्याचा...

Read moreDetails
‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर

‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर

February 20, 2026
गलगोटिया प्रसंग – भारताची वैज्ञानिक शोकांतिका: ‘ना घर का ना घाट का’

गलगोटिया प्रसंग – भारताची वैज्ञानिक शोकांतिका: ‘ना घर का ना घाट का’

February 20, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!

February 20, 2026
बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

February 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home