Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

mosami kewat by mosami kewat
December 16, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!
       

पैठण : पैठण तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पैठण तालुका अध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील मौजे कातपूर ग्रामपंचायत हद्दीतील संजय नगर, राजीव गांधीनगर, राहुल नगर येथे सुमारे 50 वर्षांपासून राहत असलेल्या आणि ग्रामपंचायत मार्फत विविध शासकीय योजनेअंतर्गत घरकुल व अन्य योजनेचा लाभ घेतलेल्या स्थानिक रहिवाशांवर जायकवाडी पाटबंधारे विभागाने शासकीय जागेवरील विनापरवानगी अतिक्रमण नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही सुरू केली.

‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय (शासन निर्णय) आहे. तरीही शासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आंदोलकांनी केला म्हटले.

आंदोलकांनी पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार आणि जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर (उत्तर) पैठणचे कार्यकारी अभियंता संत साहेब यांच्याकडे निवेदन दिले आणि खालील प्रमुख मागण्या केल्या:

१. मौजे कातपूर हद्दीतील संजय नगर, राजीव गांधीनगर, राहुलनगर येथील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे.

२. जायकवाडी पाटबंधारे विभागाने अतिक्रमण निष्कासित करण्याच्या कारवाईतून गरजू निवासी अतिक्रमणे वगळण्यात यावीत.

वरील मागण्या पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीने जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी जिल्हा सदस्य भगवानराव बनसोडे, तालुका सचिव अतुल गिरी, उपाध्यक्ष विष्णू वीर, राम मिसाळ, तालुका संघटक अभिजीत पाटील पवार, शेषराव निकाळजे, संतोष खोतकर, पंकज गायकवाड, प्रदीप ठोंबरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुंदरराव निसर्गद, आकाश गायकवाड, प्रदीप गायकवाड, गंगाधर म्हस्के, दीपक गायकवाड, अविनाश चाबुकस्वार, संतोष साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: developmentMaharashtraPaithanNewsprotestVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

Next Post

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

Next Post
कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे 'विजयी संकल्प महासभा'चे आयोजन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल!
बातमी

राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल!

by mosami kewat
April 20, 2026
0

पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी थेट लढत अहमदनगर : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित...

Read moreDetails
संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!

April 20, 2026
गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!

गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप!

April 20, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त

April 19, 2026
शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शिरड शहापूर येथे २ तास ‘रास्ता रोको’ आंदोलन; भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home