Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

mosami kewat by mosami kewat
December 15, 2025
in बातमी, राजकीय, संपादकीय
0
विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूच्या नादात त्यांनी भारताला एकही मित्र ठेवला नाही. ऑपरेशन सिंदूर युद्धाच्या वेळेस एक देश सुद्धा आपल्या सोबत उभा राहिला नाही. दोन-तीन महिन्यात पुन्हा एक युद्ध होईल. ते युद्ध सुद्धा पाकिस्तान सोबत होईल.” असे गंभीर विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी केले. ते उल्हासनगर शहरात आयोजित सभेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. “महाराष्ट्र विधानसभेत ७६ लाख मतदान सायंकाळी सहानंतर झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान घ्यायचे असेल, तर निवडणूक आयोगाची नियमावली आहे. ती नियमावली पाळली पाहिजे, त्याचा रेकॉर्ड ठेवला पाहिजे आणि तो निवडणूक आयोगाला पाठवला पाहिजे.” याबाबत वंचित बहुजन आघाडीने पत्राद्वारे माहिती मागवली असता, निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्याचे सांगण्यात आले. यावरून ॲड. आंबेडकर म्हणाले की, “जर रेकॉर्ड नसेल, तर ७६ लाख मतदान खोटं आहे.” यासंदर्भात न्यायालयात (कोर्टात) जाऊनही कोणताही राजकीय पक्ष आपल्यासोबत आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !

याच सभेत ॲड. आंबेडकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन तसेच, ‘फ्री ॲम्ब्युलन्स’ (विनामूल्य रुग्णवाहिका) सेवा आणि एका स्तंभाचे लोकार्पण देखील करण्यात आले.

संविधान जपण्याचे आवाहन :

ॲड. आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडत संविधान जपण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, स्वातंत्र्य जपणे हा आपला अधिकार आहे. जर स्वातंत्र्य जपायचे असेल, तर संविधान आपण जपले पाहिजे.”

“जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत मान-सन्मान आणि अधिकार आहे. ज्या दिवशी संविधान गेले त्या दिवशी मान-सन्मान आणि अधिकार गेला म्हणून समजा,” असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले.

‘GOAT इंडिया टूर’साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

उल्हासनगर येथे झालेल्या भव्य जाहीर सभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

Tags: bjpdevelopmentElectionElection commissionindia vs pakisatan worLocal body electionMaharashtranarendra modiPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी यांना ‘आंबेडकरच’ न्याय देणार !

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी यांना 'आंबेडकरच' न्याय देणार !

सोमनाथ सूर्यवंशी यांना 'आंबेडकरच' न्याय देणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
बातमी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
June 19, 2026
0

पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या...

Read moreDetails
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026
नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home