हैदराबाद : इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) फ्लाइट रद्द होण्याच्या संकटातून प्रवासी अद्याप सावरले नसतानाच, आता एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Rajiv Gandhi International Airport) एकाच वेळी तीन विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली.
या धमकीनंतर विमानतळावर तत्काळ ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोणती विमाने होती निशाण्यावर? विमानतळाच्या ग्राहक समर्थन ईमेल आयडीवर आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये खालील तीन विमानांचा उल्लेख होता:
१) इंडिगो (Indigo) फ्लाइट 6E7178: (केरळमधील कन्नूरहून हैदराबादला आलेले विमान)
२) लुफ्थांसा (Lufthansa) फ्लाइट LH-752
३) ब्रिटिश एअरवेज (British Airways) लंडन-हैदराबाद फ्लाइट
या धमकीचा इमेल नंतर तिन्ही विमाने सुरक्षितपणे विमानतळाावर उतरली. कोणतीही जोखीम न घेता, विमानतळ अधिकाऱ्यांनी तातडीने प्रवाशांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. सध्या ही विमाने आयसोलेशन क्षेत्रात (Isolation Area) नेण्यात आली आहेत. पोलिस, सुरक्षा एजन्सी आणि बॉम्ब स्क्वॉड पथकांकडून सर्व विमानांची कसून तपासणी सुरू आहे.
बॉम्ब शोधून काढण्याचे काम सुरू आहे. इंडिगो एअरलाइन्स जवळजवळ एका आठवड्यापासून अभूतपूर्व फ्लाइट संकटाचा (Flight Crisis) सामना करत आहे. कर्मचारी समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांमधून इंडिगोच्या शेकडो फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत, ज्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
“लोकशाही” हि राजकीय प्रणाली आणि “आर्थिक” प्रणाली यांचा अन्योन्न संबंध काय ?
संजीव चांदोरकरआज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जागवत असतांना हा प्रश्न ऐरणीवर आणण्याची गरज आहे ! अमेरिका आणि भारत हे जगातील सर्वात...
Read moreDetails






