मुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देशभरातून मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी पार्क परिसरात सुरू केली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या निवास, अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन आदी आवश्यक सोयींची तयारी नीट झाली आहे का, याचा आढावा सुजात आंबेडकर घेत आहेत.
संबंधित विभागीय अधिकारी आणि स्वयंसेवकांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना ते देत असल्याचे दिसून आले.





