मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) सज्ज झाली आहे. अनुयायांना आवश्यक सुविधा आणि सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पक्षाने केवळ प्रशासनाकडे मागणीच केली नाही, तर गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांना ठोकून काढू असा स्पष्ट इशाराही दिला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्यानंतर आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या सुविधांमध्ये सुधारणा केले जात आहेत.
नेहमीप्रमाणे यावर्षीही वंचित बहुजन आघाडीचे शेकडो स्वयंसेवक अनुयायांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. अनुयायांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा, पाणी, आरोग्य किंवा अन्य कोणतीही अडचण, गैरसोय अथवा समस्या उद्भवल्यास, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नेते आणि स्वयंसेवक तत्परतेने मदत करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.





