नागपूर : निवडणूक प्रचारासाठी नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आले असता, त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या सर्व वीरांना शहीद स्मारक येथे अभिवादन केले.
या प्रसंगी त्यांनी बलिदानाची आठवण करत, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाचे महत्व अधोरेखित केले. सुजात आंबेडकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली.
या दौऱ्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेतृत्वासह अनेक युवा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






