औरंगाबाद : शौर्य, प्रतिकार आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या पश्चिम विभागातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात पश्चिम विभागाचे अध्यक्ष राहुल मकासरे यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “बिरसा मुंडा म्हणजे वंचित समाजाच्या लढ्याचे खरे नायक. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याशी सामोरे जात जल, जंगल आणि जमीन या मूलभूत हक्कांसाठी प्रखर संघर्ष केला.
परंतु स्वतंत्र भारतातही आदिवासी बांधवांना हाच लढा कायम ठेवावा लागत आहे, आणि या अधिकारांच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर नेहमीच त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत.”
यानंतर युवक जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या पुढाकारातून आणि पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा संघटक रवि रत्नपारखे, जिल्हा सचिव मुक्तार सय्यद, जिल्हा सचिव उमेश सरदार, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण जाधव, वैजापूर तालुका अध्यक्ष सखाराम शिंगारे, गंगापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब दुशिंग, तसेच अमृतराव डोंगरदिवे, नितीन शेजवळ, अनिल रोडगे (शहर उपाध्यक्ष), निलेश बनकर,
गोपाल वाघ, आदित्य बोधक, सुमेध खंडागळे, संघर्ष गायकवाड, कपिल गायकवाड, अभिमन्यू अंभोरे, कपिल चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजन युवा पश्चिम कार्यकारिणीतर्फे करण्यात आले.





