Srinagar police station blast : श्रीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली. रात्री स्फोटाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२ हून अधिक लोक जखमी झाले. जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ही घटना झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) रात्री मोठी दुर्घटना घडली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सर्वत्र खळबळ उडाली. या भीषण स्फोटात पोलिस स्टेशनची इमारत उद्ध्वस्त झाली आहे. तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या असून मोठे नुकसान झाले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलच्या तपास करताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान पोलिसांनी तब्बल ३,००० किलोग्राम स्फोटकांचा साठा जप्त केला होता. आणि हे स्फोटक हाताळताना ही घटना घडली. या स्फोटात नऊ जण ठार झाले, तर ३२ हून अधिक जखमी झाले.
Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार
स्फोटके फरीदाबादहून आणलेली
पोलिसांनी सांगितले की, ज्या स्फोटक साहित्याची तपासणी सुरू होती, ते साहित्य नुकतेच हरियाणातील फरीदाबाद येथून जप्त करून आणले होते. ही जप्त केलेली स्फोटके जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंदशी जोडलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होती. हे मॉड्यूल काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत होते.
तपासकर्त्यांनी अटक केलेला डॉक्टर मुजम्मिल गनाई याच्या भाड्याच्या घरातून ३६० किलो अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि इतर रसायने जप्त केली होती. एकूण सुमारे ३,००० किलोग्राम स्फोटके आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते.






