मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील नामांकित लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक फ्लायिंग किंग मंजू यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला “बेगूर कॉलनी” हा चित्रपट कर्नाटक राज्यात तब्बल १०० दिवस यशस्वीपणे प्रदर्शित होत प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. चित्रपटाला मिळालेल्या या मोठ्या यशाबरोबरच त्याचा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने करण्यात आल्याने संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीवरून या चित्रपटाचे हिंदी रूपांतर करण्यात आले असून त्याला “बी.आर. आंबेडकर मैदान” हे नाव देण्यात आले आहे. हिंदी आवृत्तीचे डबिंग, लेखन व दिग्दर्शन रोनक मोसेस जानुमाला यांनी केले असून हे संपूर्ण काम J.A.D. PRODUCTIONS PVT. LTD. चे हेड ऑफ प्रॉडक्शन सतीश भटू आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईतील राजगृह येथे करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य चेतन गांगुर्डे, मा. भटू आहिरे, पोस्टर डिझायनर युवराज रोहिदास आहिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरसेवक जितूभाऊ शिरसाठ आणि शिरपूर नगरपालिका नगरसेवक सुरेश आहिरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडले.
शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट
चित्रपटातील उत्कट आणि उत्साहवर्धक गीत सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले असून त्यांच्या दमदार आवाजामुळे चित्रपटाला वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आहे.
“बी.आर. आंबेडकर मैदान” हा चित्रपट लवकरच संपूर्ण देशभर प्रदर्शित होणार असून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाचे वास्तव आणि प्रभावी चित्रण प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रदर्शना पूर्वीच प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






