Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट

mosami kewat by mosami kewat
November 13, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट

ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका बौद्ध तरुणावर अमानुष अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐरोली सेक्टर 1 येथील छत्रपती रहिवासी चाळ परिसरात जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजातील सुनील जाधव यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

रोहित महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि विशाल महाडिक असे आरोपींचे नाव आहे. या तिघा आरोपींनी एकत्र येऊन जाधव यांना मारहाण केली. तसेच बरदस्तीने त्यांच्या पायावर नाक घासायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या जयभीम वाल्यांची लायकी हीच आहे” असे म्हणत अंधारात ओढत नेऊन मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबई जिल्हा कमिटीने तातडीने हालचाल केली. जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पिडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मनोबलात भर घातली.

Jalna : वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न

“वंचित बहुजन आघाडी ठामपणे तुमच्या सोबत आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू,” अशी ग्वाही त्यांनी कुटुंबाला दिली. दरम्यान, या प्रकरणात रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

मात्र, आरोपी अद्याप फरार असून अटक करण्यास पोलिस विलंब करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. “आरोपींची तात्काळ अटक व कठोर शिक्षा होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही,” असा इशारा जिल्हाध्यक्ष जगताप व रणदिवे यांनी दिला.

या भेटीदरम्यान कविता हिवाळे, मायाताई मनवर, संदीप वाघमारे, मल्लिनाथ सोनकांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: BalasahebAmbedkarcrimejalnaMaharashtranavimumbaipoliticsVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Jalna : वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न

Next Post

शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home