जालना : ओबीसी आरक्षणावर गदा आणणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या भव्य मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. जालना येथे झालेल्या या मोर्चादरम्यान बोलताना, त्यांनी ओबीसींनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मतदान करू नये, असे थेट आवाहन केले.
ओबीसी आरक्षणाच्या लढाईत ‘राजकीय भूमिका’ घेण्याचे आवाहन
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील मराठा समुदायाला ‘कुणबी’ मानणारा जीआर (सरकारी निर्णय) काढून ओबीसींच्या यादीत घुसखोरी केली, असा आरोप केला. हा जीआर रद्द करा, ही आमची प्रमुख मागणी आहे, असे ते म्हणाले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींना ही केवळ सामाजिक नाही, तर राजकीय लढाई आहे, याची जाणीव करून दिली. ते म्हणाले:
मराठा आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला होता की, जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास ते मुख्यमंत्री राहणार नाहीत. आपले मुख्यमंत्री पद जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तो जीआर काढला, असा थेट आरोप त्यांनी केला.
धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहिष्काराचा नारा
ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करायचे असेल तर, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान न करण्याची ‘खुणगाठ’ ओबीसी समाजाने बांधली पाहिजे, असे अत्यंत स्पष्ट मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. हा निर्णय ओबीसींच्या हितासाठी आणि राजकीय दबावतंत्राचा भाग म्हणून महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.






