Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!

mosami kewat by mosami kewat
November 8, 2025
in बातमी, सामाजिक
0
‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!
       

मुंबई : ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकेकाळी अस्पृश्य म्हणून शाळेत शिक्षण घेण्यास अडचणी आल्या, त्याच बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची घटना लिहिली आणि त्यांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने जगातील १०० विद्वान विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक दिला. ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी म्हटले होते. त्यांच्या याच आदर्शानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या (The Buddhist Society of India) सर्व कार्यकर्त्यांनीही ‘आयुष्यभर विद्यार्थी’ म्हणूनच कार्यरत राहण्याचा सर्वानुमते ठराव केला.

बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या मुंबई प्रदेश शाखेचा ५७ वा वर्धापन दिन व विविध राज्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी (डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिनानिमित्त) दादर (पूर्व) येथील डॉ. आंबेडकर भवन येथे संपन्न झाला.

ॲड. भंडारे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनकार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हा संकल्प करण्याचा आग्रह केला. ते म्हणाले की, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आता ‘मिशन:२५’ नुसार बौद्ध कुटुंब, समाज व संविधान समर्थक समाज यांना एकत्र आणण्यासाठी बुद्धाची मैत्री आणि करुणा या तत्त्वांनी काम करणे आवश्यक आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी हात वर करून या संकल्पास मान्यता दिली.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. ॲड. जगदिश गवई व सुषमा पवार, राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड व बी. एम. कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष यू. जी. बोराडे व स्वाती शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. भंते राहुल बोधी यांनी त्रिशरण पंचशील देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिले.

मुंबई प्रदेशच्यावतीने केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार, राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. डॉ. एस. एस. वानखडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, कार्यकर्ते, पदाधिकारी व शाखांना विविध पुरस्कार प्रदान केले.

पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे:

  • धम्म विभूषण पुरस्कार: मोहन सोनवणे
  • संघ विभूषण पुरस्कार: अनंत जाधव
  • बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • विशेष पुरस्कार: सिताराम नरवाडे
  • सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार: जगदीश बलखंडे
  • बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सैनिक विभूषण पुरस्कार: विठोबा पवार
  • अनाथ पिंडक पुरस्कार: कौतिक दांडगे
  • मिगारमाता पुरस्कार: ॲड. आम्रपाली मगरे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी विभूषण पुरस्कार: सांची निकम, निधी निलेश कांबळे, प्रणय रवि बद्दलकर, पूनम कैलास काळे, सिद्धार्थ भिवा कांबळे, हिमाली सुभाष कटारनवरे, सन्नी दिलीप बैले.
  • शाखा पुरस्कार: प्रथम – झोन क्र. ५, द्वितीय – झोन क्र. ६, तृतीय – झोन क्र. ४.

याशिवाय, केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या पाली प्रशिक्षण अंतर्गत धम्म लिपी वर्ग उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे १२९ जणांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे यांनी भूषविले. सरचिटणीस दयानंद बडेकर आणि स्वाती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर मुंबई महिला कार्यकारिणी अध्यक्ष चंदा कासले यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष बी. एच. गायकवाड, भिकाजी कांबळे, बी. एम. कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


       
Tags: collegeColumbia UniversityDr Babasaheb AmbedkarEducationHistoryStudent dayUniversityVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!
बातमी

‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!

by mosami kewat
November 8, 2025
0

मुंबई : ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकेकाळी अस्पृश्य म्हणून शाळेत शिक्षण घेण्यास अडचणी आल्या, त्याच बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन...

Read moreDetails
पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट!

पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट!

November 8, 2025
नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Akola : नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

November 8, 2025
जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फसणार - राजेंद्र पातोडे यांचा इशारा

जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फासणार – राजेंद्र पातोडे यांचा इशारा

November 8, 2025
पार्थ पवार आणि 'अमेडिया ३ एलएलपी'च्या भागीदारांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा : जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

पार्थ पवार आणि ‘अमेडिया ३ एलएलपी’च्या भागीदारांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा : जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

November 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home