Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आगामी निवडणूकित वंचितच्या विजयासाठी सज्ज व्हा – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

mosami kewat by mosami kewat
November 7, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आगामी निवडणूकित वंचितच्या विजयासाठी सज्ज व्हा - डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

आगामी निवडणूकित वंचितच्या विजयासाठी सज्ज व्हा - डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

तिवसा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व संवाद बैठक संपन्न

अमरावती  : सत्तेतील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला असून विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधाऱ्यांना शरण गेला आहे. अशा स्थितीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सर्व ताकदीनिशी आगामी निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी सज्ज व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले. ते तिवसा येथे आयोजित जनसंपर्क कार्यालय उदघाटन व संवाद बैठक प्रसंगी बोलत होते.

बोलताना डॉ. पुंडकर म्हणाले की, आंबेडकरी समूहातील कार्यकर्ता हा लढाऊ बाण्याचा असून त्याला भीमकोरगावच्या इतिहासाचा वारसा आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे राजकारण उलथवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी नियोजनबनद्ध कृती कार्यक्रम तयार करावा असे मत डॉ. पुंडकर यांनी मांडले. काल तिवसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा निरीक्षक प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभाचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, संजय चौरपगार, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष अजय तायडे, युवा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, प्रकाश इंगळे, नंदकुमार खंडारे, राहुल भालेराव, सतीश सोनूले, प्रशांत नाईक उपस्थित होते.

मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

यावेळी डॉ. पुंडकर यांचे हस्ते फित कापून जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पार पाडले तर शहरातील पेट्रोलपंप चौकात ढोलताशांच्या गजरात नेत्यांचे स्वागत करण्यात आले. स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक आढावा बैठक पार पडली असून यावेळी सर्कल निहाय आढावा निरीक्षकानी घेतला व उमेदवार निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर भवते, संचालन मनीष खरे, तथा आभार सचिन जोगे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, डॉ. धर्मेंद्र दवाळे, मुकुंद पखाले, प्रवीण निकाळजे, अनिल सोनोने, निखिल लढे, सिद्धार्थ कटारने, मुस्ताक शहा, प्रमोद गजरे, भारत दाहाट, नितीन थोरात, रोहित गवई, अनिल गाडगे, सतीश चवरे, सागर गोपाळे, अवधूत सोनोने, अजय भवते, परिमल जवंजाळ, किशोर तायडे, आदीभ मुंद्रे सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कार्यालय उदघाटनाच्या दिवशीच सहा इच्छुकांचे अर्ज

वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुकाचे वतीने जि. प. व. पं. स. निवडणूक करिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन केले असता कार्यालय उदघाटनाचे दिवशीच पाच इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पक्ष निरीक्षकांकडे सदर केले आहे. त्यामध्ये कुऱ्हा जि.प. सर्कल करिता रुपाली प्रमोद मुंद्रे, वऱ्हा जि. प. सर्कल करितामाजी समाजकल्याण सभापती चंद्रपाल तुरकाने यांचे पुतणे स्वप्नील तुरकाने, वरखेड प. स. सर्कल मधुन सोनाली विक्रांत जोगे, तळेगाव ठाकूर प.सं सर्कल करिता मनीष खरे, अनिल सोनोने तर मोझरी प स सर्कल करिता इंजि. अमोल जवंजाळ यांनी आपले अर्ज दाखल केले आहे.

Tags: amravatiElectionsMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

Next Post

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
बातमी

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

by mosami kewat
November 7, 2025
0

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आज मोठ्या उत्साहात वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी...

Read moreDetails
आगामी निवडणूकित वंचितच्या विजयासाठी सज्ज व्हा - डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

आगामी निवडणूकित वंचितच्या विजयासाठी सज्ज व्हा – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

November 7, 2025
मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

November 7, 2025
केरळची ‘EPEP’ क्रांती: एकही नागरिक आता टोकाच्या दारिद्र्यात नाही!

केरळची ‘EPEP’ क्रांती: एकही नागरिक आता टोकाच्या दारिद्र्यात नाही!

November 7, 2025
Dr. Naresh Dadhich : प्रख्यात शास्त्रज्ञ व आयुका पुणेचे माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांचे निधन!

Dr. Naresh Dadhich : प्रख्यात शास्त्रज्ञ व आयुका पुणेचे माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांचे निधन!

November 7, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home