अकोला : बार्शिटाकळी शहरात एक महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच समता परिषदेचे शहराध्यक्ष चक्रधर राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला.
चक्रधर राऊत यांच्यासोबत मो. जफर (माजी सदस्य ग्रामपंचायत), अब्दुल सईद, जफरऊलाखान, शेख अमीन, सैय्यद बहार, आशीक खान, नईमोदीन इंजिनिअर, सैय्यद अनीस या युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास दर्शविला. हा पक्षप्रवेश सोहळा बार्शिटाकळीतील ज्येष्ठ नेते शेख नईमोद्दीन यांच्या निवासस्थानी पार पडला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, बार्शिटाकळी तालुका कार्याध्यक्ष गोरशिंग राठोड, शहराध्यक्ष अजहर पठाण, गोबा शेठ, रागिब हाजी साहेब, माजी गटनेते सुनिल सिरसाठ, माजी उपाध्यक्ष सुरेश जामनिक, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, इमरान खान, अनिल धुरंधर, जमीर मिस्त्री, सैय्यद रियासत, सैय्यद अन्सार, शैलेश सिरसाठ, अमोल जामनिक, अमित तायडे, शुभम इंगळे, रक्षक जाधव यांसह बार्शिटाकळी नगरपंचायतचे अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल जाधव यांनी मानले. या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला बार्शिटाकळी तालुक्यात नवे बळ मिळाले आहे.






