Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे रेल्वे स्थानक हादरले! खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात

mosami kewat by mosami kewat
February 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे रेल्वे स्थानक हादरले! खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात
       
पुणे: पुणे शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावी जाण्यासाठी फलाटावर झोपलेल्या एका मजूर कुटुंबातील ४ वर्षांच्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेल्याची आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मात्र, रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या साडेचार तासांत नराधमाला बेड्या ठोकल्या. (Pune crime news)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मध्य प्रदेशातील असून तिचे कुटुंबीय पुण्यात मोलमजुरी करतात. मंगळवारी मध्यरात्री हे कुटुंब मध्य प्रदेशातील खांडवा येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. रेल्वेची वाट पाहत असताना फलाट क्रमांक ३ वर सर्वजण झोपले होते.

याच संधीचा फायदा घेत आरोपी महेश यादव (वय २५) याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. रात्री दीडच्या सुमारास मुलीचे वडील जागे झाले असता त्यांना मुलगी गायब असल्याचे समजले. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. (Pune crime news)

घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित तरुण मुलीला हात धरून फलाटाच्या टोकाला घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आणि पहाटे ६ च्या सुमारास पार्सल गेट जवळून आरोपीला अटक केली व मुलीची सुटका केली. आरोपी महेश यादव (वय २५) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार बलात्कार, अपहरण आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपी हा पीडित कुटुंबाच्या परिचयाचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित मुलीला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांच्या, विशेषतः महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags: MaharashtraPoliticalpune crime newsPune StationVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

Next Post

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

Next Post
सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home