खुलताबाद तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीच्या खुलताबाद तालुका कार्यकारिणी निवडीसाठी आज मोठ्या उत्साहात मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतींना कार्यकर्त्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी खुलताबाद तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत जाहीरपणे दाखल झाले.
दरेगाव पाडळी येथील भाजप कार्यकर्ते मारूती एकनाथ बनकर, राजू कचरू नलावडे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे योगेश रामराव बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संदीप शामराव साळवे, तसेच निळू घाटे यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक बळकट झाली असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव अंजन साळवे, प्रविण हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबा पटेल, जिल्हा सचिव मुक्तार भाई सय्यद, उमेश सरदार, संपर्क प्रमुख गणेश खोतकर, तसेच राजाराम घुसाळे, आण्णा बनकर, अरुण गायकवाड, कलीम पठाण, राजू नलावडे, कैलास गिरी, योगेश घाटे, गणेश तांदळे, पोपट भालेराव, योगेश साबळे, योगेश गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आणि मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.






