मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी लालडोंगर, चेंबूर येथे भेट देऊन दिवंगत वसंतराव निळोबाजी ठोके (ठोके मामा) यांच्या परिवाराला सांत्वनपर भेट दिली.
दिवंगत वसंतराव ठोके हे बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक तसेच भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या प्रवासातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत सहकारी होते. त्यांच्या निधनाने पक्षाने एक निष्ठावंत, समर्पित आणि तळागाळातील कार्यकर्त्याला गमावले आहे.
Nashik : भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश
या भेटीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ठोके परिवाराचे सांत्वन करत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच पक्षाच्या वतीने त्यांच्या योगदानाचे स्मरण करत आदरांजली अर्पण केली.
ठोके मामांच्या कार्याची आठवण काढत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, “ठोके मामा हे केवळ पक्षाचे नव्हे तर विचारांचे योद्धे होते. त्यांचे आयुष्य हे वंचितांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.” या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






