Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

धाडी-बल्लाळी येथे किडनीच्या रुग्णांसाठी वंचित बहुजन युवा आघाडी ॲक्शन मोडवर; चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे निर्देश

mosami kewat by mosami kewat
October 21, 2025
in Uncategorized
0
धाडी-बल्लाळी येथे किडनीच्या रुग्णांसाठी वंचित बहुजन युवा आघाडी ॲक्शन मोडवर; चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे निर्देश
       

अकोला : धाडी-बल्लाळी गावात अनेक नागरिक किडनीच्या विकाराने त्रस्त असून, दूषित पाणी आणि इतर समस्यांमुळे आतापर्यंत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या धक्कादायक घटनेनंतर वंचित बहुजन युवा आघाडीने तात्काळ ‘ॲक्शन मोड’मध्ये येत जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांच्यासह गावाला भेट दिली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

सात जणांचा बळी; १२ जणांवर उपचार

स्थानिक वंचित युवा आघाडीचे कार्यकर्ते लखन चव्हाण आणि अजय बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनीच्या आजाराने गावात कंकुला शिंदे, कमला शिंदे, ज्ञानदेव शिंदे, निर्मला साळुंके, प्रभा शिंदे, लाला शिंदे, प्रमिला बाबर, आणि धर्मा शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. सध्या इमला शिंदे, प्रल्हाद बाबर, भागा माळवे, संजय बाबर, बाबुराव बाबर, शोभा शिंदे, गिता बाबर, मोतीराम शिंदे, शंकर बाबर, गंगा शिंदे आणि हरा बाबर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

४ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देशगावकर्‍यांच्या आरोपानुसार, दूषित पाण्यामुळे हे किडनीचे विकार बळावले आहेत. गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहीर तयार असून पाईपलाईनही टाकण्यात आली आहे, परंतु पाणीपुरवठा सुरू झाला नव्हता. या गंभीर समस्येची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांच्यासमोर तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची आणि युद्धपातळीवर काम करण्याची मागणी केली.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता मिलिंद जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना उद्यापासूनच काम सुरू करून चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य तपासणी शिबिराचा निर्धार

पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासोबतच, युवा आघाडीने लवकरच गावात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून नागरिकांची तपासणी करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या भेटीदरम्यान युवा आघाडीच्या नेत्यांनी नुकत्याच दिवंगत झालेल्या प्रमिला मोहन बाबर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच, मीरा शंकर बाबर, विमल गोविंदा शिंदे, शशिकला प्रल्हाद बाबर आणि शोभा सुरेश बाबर यांच्यासह अनेक गावकऱ्यांशी राजेंद्र पातोडे यांनी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे, अमोल वानखडे, सचिन शिराळे, विजय पातोडे, जय तायडे, नागेश उमाळे, राजदार खान, राहुल कळंब, श्रीकृष्ण देव कुणबी, निशिकांत सरदार, सोनु डोंगरे, पीयूष पवार, युवराज डोंगरे, प्रकाश अंभोरे, संकेत डोंगरे, श्रीकृष्ण पातोडे, अमोल डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolahospitalJusticeMaharashtraSocial JusticeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुनिल गवळी यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Next Post

वंचित बहुजन आघाडीत भीमशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश!

Next Post
वंचित बहुजन आघाडीत भीमशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा  जाहीर प्रवेश!

वंचित बहुजन आघाडीत भीमशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!
बातमी

मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!

by mosami kewat
December 23, 2025
0

अकोला : नुकत्याच पार पडलेल्या मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष नगरसेवक संदीप सरनाईक आणि शुभांगी संदीप सरनाईक यांनी वंचित बहुजन आघाडीत...

Read moreDetails
धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

December 23, 2025
नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव

नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव

December 23, 2025
काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली - प्रकाश आंबेडकर

काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली – प्रकाश आंबेडकर

December 23, 2025
यवतमाळच्या विजयी नगरसेवकांनी घेतली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

यवतमाळच्या विजयी नगरसेवकांनी घेतली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

December 23, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home