आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दमदार सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग दोन सामने जिंकले. मात्र, विजयी हॅटट्रिक करण्याचं टीम इंडियाचं स्वप्न दक्षिण आफ्रिकेने भंग केलं.
दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील टीम इंडियाविरुद्धचा सलग तिसरा विजय नोंदवला. आता या पराभवातून सावरून, टीम इंडिया पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
सामना कधी आणि कुठे?
भारतीय महिला संघ आपला चौथा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हा ‘हाय-व्होल्टेज’ सामना रविवार, १२ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
हा रोमांचक सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल, तर नाणेफेक (टॉस) दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होईल. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करेल, तर एलिसा हीली ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळेल.
संघांची कामगिरी
- स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ३-३ सामने खेळले आहेत.
- भारतीय संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभूत व्हाव लागल.
- ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर त्यांचा १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे.