नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘निर्धार मेळावा’ संदर्भात जिल्हा कमिटीची नियोजन बैठक ऐरोली येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे आणि ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र बनसोडे यांनी केले. बैठकीत उपस्थित आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या यशासाठी सूचना मांडल्या. सर्व पदाधिकाऱ्यांनी वादविवाद बाजूला ठेवून एकदिलाने आणि एकमताने निर्धार मेळावा भव्य व यशस्वी करण्याचा संकल्प केला. तसेच जिल्हा कमिटी जे जबाबदाऱ्या सोपवेल त्या पूर्ण जबाबदारीने पार पाडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बैठकीत सुनील भोले (महासचिव), अजय शिंदे (महासचिव), साक्षी लोट्टे (महिला महासचिव) तसेच दीपक बाणाईत, गौतम कांबळे, संजू जवादे, नमिता भालेराव, सुरेखा वानखेडे, सीमा बनसोडे, मनकर्णा लाटे, निर्मला गमरे, पल्लवी शिंदे, संदेश हत्तरगे, संदीप वाघमारे,
रामदास कांबळे, राजेश भालेराव, संभाजी वाघमारे, गजानंद जाधव, उत्तम रोकडे, जयराम जाधव, अशोक जमदाडे, मल्लिनाथ सोनकांबळे, मनोज पवार, प्रदीप भुते, आकाश भारदे, ऍड. अजय गायकवाड, सतीश भोसले, विकास सोनावणे, गौतम सपकाळे, दत्तात्रय कांबळे, पिराजी दांडगे, आकाश मस्के, सहदेव मस्के, वैभव वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.