नवी मुंबई : ऐरोली येथील एका १६ वर्षीय चांभार समाजातील मुलीने शाळेत परीक्षा देत असताना झालेल्या सार्वजनिक जातीवाचक अपमानामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापिका देशमुख यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना वाचवणाऱ्या पोलीस यंत्रणेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगलाच चपराक दिला आहे.
मृत मुलीला न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले की, “मृत मुलीच्या मारेकरी मुख्याध्यापिका देशमुख यांना जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय तसेच योग्य ती कडक शिक्षा केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.”
जातीवाचक अपमानामुळे एका शाळकरी मुलीला आपले जीवन संपवावे लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.