Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सिंधगाव येथे मुस्लिम समाजाची वंचित बहुजन आघाडीसोबत बैठक

mosami kewat by mosami kewat
September 27, 2025
in बातमी
0
सिंधगाव येथे मुस्लिम समाजाची वंचित बहुजन आघाडीसोबत बैठक
       

लातूर : रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे मुस्लिम समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांना आमंत्रित करून बैठक आयोजित केली. या बैठकीत सलीम सय्यद यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कब्रस्तानाचा प्रश्न मांडला. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांनी हा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन मुस्लिम समाजाची मते घेतली, मात्र सत्तेत आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने समाजात तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद म्हणाले की, “देशभरातील वंचित घटकांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर ठामपणे लढा देत आहेत. त्यांच्या आदेशानुसार सिंधगावातील मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

त्यांनी पुढे सांगितले की, कबरस्तानाच्या प्रश्नास आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर मांडून तो सोडविला जाईल. तसेच मुस्लिम समाजानेही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस तालुका अध्यक्ष रतन आचार्य, तालुका महासचिव विशाल मस्के, तालुका उपाध्यक्ष अहमद शेख यांच्यासह सिंधगावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: JusticeMaharashtraRenapurVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

MPSC मोठी बातमी: अतिवृष्टीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली; ‘या’ दिवशी होणार!

Next Post

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा – ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Next Post
Nagpur : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा - ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home