पुणे : तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या “किन्नर माँ एक सामाजिक संस्था” या संस्थेचा ११वा वर्धापन दिन नुकताच एका विशेष कार्यक्रमात साजरा झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. तसेच, पत्रकार विशाल पाटील आणि इतर अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या ११ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करताना, या मान्यवरांनी संस्थेच्या टीमचे अभिनंदन केले. संस्थेने समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेल्या भरीव कार्याची त्यांनी दखल घेतली आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलताना, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या ११ वर्षांत संस्थेने मिळवलेल्या यशाची माहिती दिली आणि समाजाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल “किन्नर माँ एक सामाजिक संस्था” च्या संपूर्ण टीमचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.