अकोला : आज भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा तसेच महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले.
या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे जाहीर केले की, जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते तसेच बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.