Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
September 15, 2025
in बातमी
0
इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : इगतपुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. पाडळी दे येथील श्री हरी ओम हॉटेलमध्ये झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे होते. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ​

या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय साबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भारत बुकाणे, विश्वनाथ भालेराव, जिल्हा संघटक दीपक भंडारी, जिल्हा महासचिव विनय कटारे, विक्रम जगताप, संतोष उबाळे, संदीप काकळीज, दिनेश गायकवाड, नाशिक युवा अध्यक्ष विकी वाकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ​

या बैठकीत तालुका कार्यकारिणी, युवक तालुका, शहर कार्यकारिणी, गटप्रमुख आणि गणप्रमुख यांची नेमणूक करण्यावर चर्चा झाली. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शेतकरी आणि अन्याय-अत्याचारांच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यावरही भर देण्यात आला. ​या बैठकीनंतर पक्ष निरीक्षक मधुकर कडलक आणि विलास गुंजाळ यांनी तालुक्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ​गोंदे दुमाला औद्योगिक ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे, युवा नेते चंद्रकांत सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष हनुमंत साबळे, युवा उपाध्यक्ष विनोद बागुल, ज्येष्ठ नेते तुळशीराम शिंदे, युवा तालुका संघटक युवराज सोनवणे, दीपक शिरसाठ आणि शांताराम जगताप यांनी या बैठकीचे यशस्वी आयोजन केले.

Tags: ElectionigatpuriMaharashtranashikPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे – प्रा. किसन चव्हाण

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

by mosami kewat
June 12, 2026
0

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' दरम्यान मोठा तणाव...

Read moreDetails
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

June 12, 2026
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home