Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 26, 2025
in Uncategorized, बातमी, विशेष, सामाजिक
0
स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

       

राज्यात महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची मोहीम राबवली जात असताना नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य घरगुती ग्राहकांकडे हे मीटर लावणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे सरकारने आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट होत आहे.

महावितरणने मीटरचे नाव बदलून ‘टाइम ऑफ डे (T.O.D.) मीटर’ केले असून, सध्या दररोज सुमारे ४५ हजार मीटर लावले जात आहेत. मार्च २०२६ पर्यंत राज्यातील सर्व २.२५ कोटी ग्राहकांकडे हे मीटर लावण्याचे उद्दिष्ट महावितरणने जाहीर केले आहे. यावरून अनेक रहिवासी संकुलांमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

या योजनेअंतर्गत प्रति मीटर सुमारे १२ हजार रुपयांचा खर्च येणार असून त्यातील बहुतांश रक्कम कर्जरूपाने उभारली जाणार आहे. परिणामी, १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या वीजदरात ३० पैसे प्रतियुनिट दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, हे स्मार्ट मीटर अधिक वेगाने फिरतात, त्यामुळे वाढीव वीजबिलाचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसणार, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, विद्युत कामगार संघटनांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. स्मार्ट मीटरचे काम खासगी कंपन्यांना दिल्यामुळे महावितरणमधील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, हे मीटरही छेडछाड आणि चोरीपासून पूर्णतः सुरक्षित नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे वीज क्षेत्राच्या खासगीकरणाची वाट मोकळी केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

महावितरणकडून मात्र या योजनेचे समर्थन करताना सांगितले जात आहे की, ‘टाइम ऑफ डे’ तंत्रज्ञानामुळे सौर ऊर्जेच्या वेळेत ग्राहकांना वीज सवलतीच्या दराने मिळू शकते. शिवाय, वीज चोरी आणि गळती कमी होऊन कंपनीच्या आर्थिक स्थितीला उभारी मिळेल, अशी भूमिका महावितरणने मांडली आहे. सध्या सोशल मीडियावर “स्मार्ट प्रीपेड मीटर नकोत” अशी मोहीम जोर धरत असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज करून महावितरण कार्यालयांत हे मीटर न लावण्याची मागणी केली जात आहे.








       
Tags: महावितरणस्मार्ट प्रीपेड मीटर
Previous Post

अमिताभ बच्चन यांचा बदललेला आवाज पाहून प्रेक्षकांचा संताप; ‘अग्निपथ’ प्रदर्शना वेळी थिएटरमध्ये तोडफोड!

Next Post

आणीबाणीच्या राजकारण आणि हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी!

Next Post
आणीबाणीच्या राजकारण आणि हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी !

आणीबाणीच्या राजकारण आणि हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !
अर्थ विषयक

“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !

by mosami kewat
October 31, 2025
0

संजीव चांदोरकर फक्त सप्टेंबर महिन्यात देशात क्रेडिट कार्ड वापरून २,१७,००० कोटी रुपयांची खरेदी केली गेली. एक ऐतिहासक उच्चांक! ऑक्टोबरचा आकडा...

Read moreDetails
कामगार एकतेचा शतकी प्रवास - आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

कामगार एकतेचा शतकी प्रवास – आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये 'वर्धा लाईव्ह' फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वर्धा लाईव्ह’ फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 31, 2025
अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

October 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home