Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2025
in बातमी
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित

Akola, Nov 20 (ANI): Voters wait in queues to cast their vote for the Maharashtra Assembly Elections, in Akola on Wednesday. (ANI Photo)

       

पुणे –

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या निकालानंतर आयोगाने या संदर्भातील तयारीला वेग दिला असून, कर्मचारी प्रशिक्षणासह इतर तयारी सुरू करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जवळपास सात लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याचे समजते मात्र, आगामी स्थानिक निवडणुकांसाठी नियमानुसार विधानसभा निवडणुकांसाठी निश्चित केलेली अंतिम मतदारयादीच वापरली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पत्र लिहून, आगामी निवडणुकांसाठी अंतिम मतदारयादीची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या निवडणुकांमध्ये तब्बल ७ लाख नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे सांगितले जाते आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात एकूण मतदारसंख्या नऊ कोटी ७३ लाखांच्या घरात होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर हा आकडा जवळपास नऊ कोटी ८० लाखांवर पोहोचला आहे. मात्र, नव्याने समाविष्ट झालेल्या तब्बल सात लाख नवमतदारांना या नियमाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कायद्यानुसार, स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकांसाठी वापरली जाणारी अंतिम मतदारयादीच वापरली जाते. त्यामुळे आगामी काळात राज्यात होणाऱ्या महापालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी ही यादी वापारली जाणार असल्याचे सांगण्यात येते.


       
Tags: 7 lakhbodydeprivedElectionslocalMaharashtranewremainVanchit Bahujan Aaghadivoters
Previous Post

दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी

Next Post

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील – नितेश राणे

Next Post
दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील   – नितेश राणे

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील - नितेश राणे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लातूर-धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन
बातमी

लातूर-धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

by mosami kewat
September 7, 2025
0

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails
महाबोधी महाविहार मुक्ती अभियानाचा तिवसात समारोप, बौद्ध जनतेचे पाठबळ

महाबोधी महाविहार मुक्ती अभियानाचा तिवसात समारोप, बौद्ध जनतेचे पाठबळ

September 7, 2025
वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर-दक्षिण आढावा बैठक संपन्न

वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर-दक्षिण आढावा बैठक संपन्न

September 7, 2025
धानोरा खुर्द (मापारी) येथे बौद्ध बांधवाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

धानोरा खुर्द (मापारी) येथे बौद्ध बांधवाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

September 7, 2025
शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी 'शिक्षण सेवक योजना' रद्द करा - वंचित बहुजन आघाडी

शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘शिक्षण सेवक योजना’ रद्द करा – वंचित बहुजन आघाडी

September 7, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home