Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 3, 2025
in बातमी, राजकीय
0
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन
       

Image

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुक्याच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून हे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांचे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध, विधवा, अपंग आणि निराधार नागरिकांसाठी हे मानधन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांचे मानधन रखडले आहे. सध्या शेतीची मशागत तसेच पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत, त्यांना लवकरात लवकर मदत मिळाल्यास त्याना पेरणी करण्यास सोयीचे होईल, तरी शेतकऱ्यांनाही शासकीय मदत लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.

अन्यथा तीन दिवसानंतर प्रत्येक तहसीलदार कार्यालयाला बेशरमचे तोरण बांधण्यात येतील, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने देण्यात आला. शासनाने काही महिन्यांपूर्वी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे मानधन थेट लाभहस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थ्यांना मानधन मिळालेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे DBT प्रणाली अद्याप पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या हजारो लाभार्थ्यांना घर चालवणेही कठीण झाले आहे. अनेक जण किराणा, औषधे आणि दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून आहेत. काही लाभार्थी अर्धपोटी दिवस काढत आहेत, तर काहींना भिकेची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने DBT प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत जुनी ऑफलाइन पद्धत लागू करून थकीत मानधन त्वरीत द्यावे, अशी मागणी होत आहे. अकोला जिल्ह्यातील हजारो लाभार्थी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या रखडलेल्या मानधनामुळे आर्थिक शासनाने तातडीने सदर थकीत मानधन द्यावे,

तसेच मागील वर्षी सन २०२४ खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टी ची मदत जाहीर झाली त्यानंतर VK नंबर मिळून सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून अंदाजे एक महिना उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. यावेळी नितीन वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष झिया शाह, तालुका अध्यक्ष राजेश दारोकार, तालुका महासचिव अनंता इंगळे, प्रफुल मोरे, कपिल भोजने, नागेश तायडे, निखिल तायडे, रोहीत हीवराळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: Akolasanjay gandhi niradharVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना

Next Post

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

Next Post
2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home