Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वांचितांना सत्तेत पाठविण्यासाठी शिक्षक प्राध्यापकांच्या वैचारिक सहकार्याची गरज – रेखा ठाकुर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 9, 2021
in बातमी
0
वांचितांना सत्तेत पाठविण्यासाठी शिक्षक प्राध्यापकांच्या वैचारिक सहकार्याची गरज – रेखा ठाकुर
       

फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या विभागीय समन्यायकांच्या बैठकीत कृती आराखडा  तयार

औरंगाबाद – फुले-आंबेडकर विद्वतसभा या संघटनेच्या महाराष्ट्रातील विभागिय समन्वयकांची चिंतन बैठक नुकतीच औरंगाबादमध्ये पार पडली असून सदरील  बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकुर होत्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, महाराष्ट्रात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य माणसाला सतेत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून आज काम करत आहे.

निवडणुका येतील जातील पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वंचित अतिशय चोखपने लोकशाहीच्या मार्गाने लढत असुन या प्रश्नांना  वाचा फोडत आहे. मा. बाळासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येत्या काळात वंचितांना सत्येत घेऊन  जान्याचा निश्चय केला आहे. हा निर्धार पूर्ण करायचा असेल तर महाराष्ट्रातील कानाकोप-यात समाजातील विशिष्ट स्तरावर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या बुद्धिजीवी  वर्गाने आता या विद्वत सभेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहने गरजेचे आहे. घराणेशाहीचा कचाट्यात सापडलेल्या शिक्षणसंस्था त्यातून पसरविल्या जाणारा बनावट पुरोगामी विचार हा कधीच सर्वसामान्यांना शिक्षण, रोजगार, व सन्मानाची संधी उपलब्ध करून देऊ शकणार नाही. पुरोगामी विचाराच्या बाता मारून मनुवादाचे जतन करणाऱ्या कांग्रेस- राष्ट्रवादी किंवा तत्सम राजकीय पक्षाचा बुरखा फाडण्यासाठी आता वंचित समुहातुन येणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांनी समोर यायला पाहिजे. त्यांच्या सहकार्यानेच वंचितांना सत्तेत पाठवु तेव्हा बुद्धीजीवी  वर्गाने  वैचारिक व दिशादर्शक चळवळ वंचितांसाठी उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

त्यांनी सहकार्य केल्यास आपण सत्तेत जाऊ, असे मत रेखा ठाकुर  यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनीही मार्गदर्शन केले. मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रनबागूल यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विद्वत् सभेचे नवनियुक्त राज्य समन्वयक  प्रा. डॉ. मनोज निकाळजे यांनी भूमिका मांडली तर राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी आढावा सादर केला, प्रा. भारत शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी प्रा. डॉ. प्रज्ञा साळवे, गाथा वाघमारे, अनिता गोलकोंडा, प्रा. गजेंद्र लांडे, डॉ. बलभीम वाघमारे, डॉ. माधव पुणेकर, प्रा. अमोल भगत, प्रा. सोनाजी इंगळे, डॉ. विठ्ठल कर्णे, विनायक खडसे, प्रा. भीमराव उबाळे, प्रा. अवचार, ओंकेश बनसोडे, भास्कर हिवाळे, डॉ विशाल ओव्हाळ, डॉ. सुरवाडे, डॉ. किशोर वाघ, जयपाल सुकाळे, अक्रमखान, भीमराव वाघमारे, आणि भारत सिरसाठ आदी उपस्थित होते.


       
Tags: aurangabadrekhathakurVanchit Bahujan Aaghadividvatsabha
Previous Post

जेव्हा देश मेरी कोम सोबत अश्रू ढाळतो

Next Post

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक व्यक्तीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ही काळाची गरज – अशोक सोनोने

Next Post
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक व्यक्तीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ही काळाची गरज – अशोक सोनोने

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक व्यक्तीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ही काळाची गरज - अशोक सोनोने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
बातमी

वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

by mosami kewat
January 18, 2026
0

नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...

Read moreDetails
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

January 18, 2026
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

January 17, 2026
काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

January 17, 2026
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

January 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home