अकोला – सन २०१९-२० वर्षी सोयाबीन उत्पादन कमी झालेले असताना सुध्दा विमा कंपनीने पिक विमा मंजूर केला नाही.कृषी विभागामार्फत रॅंडम प्लॉटच्या माध्यमातून सर्वेक्षण केले असता उत्पादन कमी आले.विमा कंपन्यांनी कोणताही दुजा भाव न करता सरसकट विमा मंजूर करावा.पुर्वी शेततळ्याचे अनूदान देयक ८२५०९ रु होते. मागील सरकार मधील एका अभ्यासु आमदारा च्या मताप्रमाणे शेततळ्याचे अनूदान रक्कम कमी केली.त्यामुळे आज शेतकऱ्यांना जवळुन रक्कम खर्च करावी लागत आहे.आजच्या महागाई आणि लॉकडाउन चा विचार करता शेततळ्याची अनुदान रक्कम पोखरा व मागेल त्याला शेततळे अंतर्गत वाढवून देण्यात यावी यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (प्रभारी) अरुण वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश महासचिव महीला आघाडी अरुंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, प्रतिभाताई अवचार,दिनकर खंडारे, अॅड नरेंद्र बेलसरे, गजानन दांडगे, विजय तायडे, पुरषोत्तम अहिर, संतोष वनवे, गजानन साठे, नारायण मानवतकर, प्रमोद इंगळे, मनोहर बनसोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे यांनी कळविले आहे.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails